पुणे- वारजे येथील सद्गुरू सेवा प्रतिष्ठान व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , समग्र शिक्षा कार्यालय पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे, कर्वेनगर, एरंडवणा व कोथरूड विभागातील “दिव्यांग मित्र” उपक्रमाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, चष्मा व महिनाभर पुरेल एवढा किराणा वाटप कार्यक्रम मनपा शाळा क्रमांक 161 बी दिगंबर वाडी, वारजे येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात शाळाबाह्य सर्वेक्षणात सापडलेले व जुन्या साधन साहित्याच्या मापात बदल झालेले एकूण 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना 71,900 रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या .डॉ.शोभा खंदारे डॉ.महेश शेंडकर,श्री कृष्ण फडतरे ,श्रीमती शिल्पकला रंधवे, सौ अरुणा राहींज आदी उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. तसेच श्री सद्गुरु सेवा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष सचिन नामदेव म्हसे व त्यांच्या टीमच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
प्रातिनिधिक स्वरूपात सौ स्तुती ताकवले, सोहम चव्हाण या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन, open बुक लायब्ररी च्या प्रियांका चौधरी, अभिषेक अवचार आणि वर्ल्ड मराठा organisation चे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन नामदेव म्हसे व श्रीमती नंदा नामदेव म्हसे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या विशेष साधन व्यक्ती श्रीमती स्मिता सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, श्रीमती स्वाती धुमाळ, श्रीमती रश्मी परदेशी, मनपा शाळा क्रमांक 161 बी,दिगंबरवाडी वारजे मुख्याध्यापिका श्रीमती वाल्हेकर मॅडम यांनी सहकार्य केले.