फ्रान्स मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त १० फ्रेंच पाहुणे पुणे भेटीवर

Date:

पुणे :
फ्रान्स मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुणे भेटीवर आलेल्या १० फ्रेंच पाहुण्यांनी पुण्याच्या ऐतिहासिक ,सांस्कृतिक महत्वाच्या स्थळांना भेटी देऊन पुण्याच्या विविधतेचा आनंद लुटला .
लिओपाल्ड यांच्या नेतृत्वाखालील गटाने शनिवार वाडा ,आदिवासी संग्रहालय ,ललित कला केंद्र ,डॉ नितीन उनकुले यांचे योग प्रशिक्षण केंद्र ,मुरुडकर झेंडेवाले ,दागिने निर्मिती प्रकल्प ,अशा ठिकाणांना भेटी दिल्या . पालिकेत १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाला उपस्थित राहिल्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांनी या सदस्यांचा सत्कार केला . वन्य जीवनावरील माहितीपट देखील त्यांनी पाहिला . फ्रांस मित्र मंडळाच्या पुण्यातील यजमानांच्या घरी राहून त्यांनी भारतीय जीवन शैलीचा परिचय करून घेतला .
डॉ सतीश देसाई ,भारती भिडे ,उल्हास जोशी ,चंद्रकांत कुडाळ ,प्रदीप कोपर्डेकर ,जयंत शाळीग्राम ,नितीन मेमाणे ,रवी चौधरी ,डॉ दीपक  मांडे ,स्मिता पेठे , नितीन मेमाणे इत्यादींनी या भेटींचे संयोजन केले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातूनच स्त्री सक्षमीकरण शक्य

एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव...

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण...