पुणे- गुलबार्ग्यातील आळंद येथे राहणाऱ्या चौघांनी लोहगाव मधील एका २५ वर्षीय तरुणाच्या घरात घुसून त्याच्या आईला आणि पत्नीला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी सांगितले कि या प्रकरणी विमान नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गुलाब चव्हाण (वय २८ ),आकाश रमेश राठोड (वय ३५ )नीलकंठ बाबू आडे (वय ३१ ),दिगंबर रमेश राठोड (वय २८ ) असेगुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत . यातील संदीप यांने ७ महिन्यापूर्वी संबधित तरुणाला साडेचार लाख रुपये उसने दिले होते या वादातून हा प्रकार झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.पोलीस उपनिरीक्षक एस एस कोल्ळूरे अधिक तपास करत आहेत .