माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Date:

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फडणवीस यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करत आहे. मात्र आता मी ब्रेक घ्यावा अशी देवाची इच्छा असेल. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन होत आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले की, ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.’देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक दिवसांपासून नुकसानग्रस्त भागांचे दौरे करत आहेत.नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांचा दौरा सुरू झाला होता. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांमध्ये फडणवीसांनी पाहणी केली होती. तसेच त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...