प्रतिष्ठित फोर्ब्स मिडल ईस्ट मानांकन यादीत मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांना ३३ वे स्थान

Date:

अरब जगतातील वर्ष २०१६ च्या आघाडीच्या भारतीय नेत्यांमध्ये समावेश

 

अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय (जय) दातार यांचा फोर्ब्स मिडल ईस्टतर्फे नुकताच अरब जगतातील वर्ष २०१६ चे आघाडीचे ३३ वे भारतीय नेते म्हणून गौरव करण्यात आला. फोर्ब्स एमईसारख्या अत्यंत विश्वसनीय माध्यमगृहातर्फे हे मानांकन प्राप्त होणे, हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया मसाला किंग या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. दातार यांनी व्यक्त केली आहे. फोर्थ टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१६ वॉर्ड्स हा पुरस्कार सोहळा नुकताच संयुक्त अरब अमिरातीत (युएई) वॉल्डॉर्फ स्टोरिया दुबई पाम जुमैरा येथे संपन्न झाला. कर्तृत्ववान भारतीयांचे यश साजरे करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

अल अदील ग्रुपचे संस्थापक डॉ. दातार हे प्रामुख्याने रीटेल क्षेत्रात कार्यरत असून फोर्ब्स मिडल ईस्टच्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत.

 

आखाती क्षेत्रातील अनिवासी भारतीयांनी या भागाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी फोर्ब्स मिडल ईस्टतर्फे दरवर्षी १०० भारतीय उद्योजकांना पारितोषिके दिली जातात. यंदा बहुराष्ट्रीय कंपन्या व अरब कंपन्यांतील कार्यकारी व्यवस्थापनातील आघाडीचे ५० भारतीय अशी आणखी एक मानांकन यादी प्रसिद्ध करण्यात आली. अरब क्षेत्राच्या प्रगतीप्रती या भारतीयांची आकांक्षा व त्यांनी दिलेले योगदान यांचा गौरव करण्यासाठी फोर्ब्स मिडल ईस्टने अरब जगतातील आघाडीच्या भारतीयांची आपली बहुप्रतिक्षीत यादी समारंभपूर्वक जाहीर केली. या कार्यक्रमाला अनेक नामवंत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील राजदूत टी पी. सीताराम आणि अन्य ख्यातनाम पाहुण्यांबरोबर उपस्थित होते.

 

हे मानांकन म्हणजे अरब जगतात निवास करणाऱ्या आणि तेथे व्यवसाय असणाऱ्या भारतीय व्यावसायिकांचा सखोल अभ्यास व विश्लेषणाचे फलित आहे. प्रारंभी २५० व्यावसायिकांची यादी तयार केली गेली आणि नंतर त्यातून १०० उद्योजकांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली. प्राथमिक साधनसामग्रीद्वारे गोळा केलेली माहिती व या उद्योजकांकडून भरुन घेतलेली प्रश्नावली यावर हे संशोधन आधारित असते. फोर्ब्स मिडल ईस्ट हा व्यावसायिक माहिती व सहयोगाचा प्रमुख संदर्भ बिंदू आहे, जो पश्चिम आशियाच्या विविध क्षेत्रांतील निर्णयकर्ते व गुंतवणूकदारांना साह्य करतोच, परंतु अरब जगतातील आर्थिक विकासही पुढे नेतो. हे मानांकन जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही चांगले परिणाम घडवण्यास कारणीभूत ठरते.

 

हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, की गौरव आणि सन्मान आमच्या कामाची जबाबदारी अधिकच वाढवतात. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदारीच्या मार्गाने मूल्यवृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर माझी दृढ श्रद्धा आहे. या सन्मानासाठी मी फोर्ब्स मिडल ईस्टचे आभार मानतो. आमच्या संपूर्ण समूहाच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचेच हे प्रतिबिंब आहे. मी या महान देशाच्या राज्यकर्त्यांचेही आभार मानतो, ज्यांनी आमच्या कार्याला नेहमी मदत आणि प्रोत्साहन दिले आहे. यादीतील बहुसंख्य आघाडीचे नेते व उद्योजक संयुक्त अरब अमिरातीत स्थाईक असल्याचे आढळते. आम्हाला या देशातील नेत्यांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याचेच हे स्पष्ट प्रतिबिंब आहे.

 

अल अदील ट्रेडिंगने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स या नावाने मुंबईत कार्यरत आहे. अल अदील समूहाचे ३१ आऊटलेट्स, २ पिठाच्या गिरण्या व २ मसाल्याच्या गिरण्या असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड नावाने मुंबईत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच ओमान व बहारीनमध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.

 

फोटो ओळी –अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉ. धनंजय (जय) दातार यांना फोर्ब्स मिडल ईस्टतर्फे नुकतेच अरब जगतातील वर्ष २०१६ मधील ३३वे आघाडीचे भारतीय नेते म्हणून गौरवण्यात आले. भारतीय उद्योगपतींचे हे यश साजरे करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीतील वॉल्डॉर्फ अस्टोरिया दुबई पाम जुमैरा येथे आयोजित केलेल्या एका शानदार समारंभात डॉ. दातार यांनी हा सन्मान भारताचे संयुक्त अरब अमिरातीतील राजदूत टी. पी. सीताराम यांच्या हस्ते स्विकारला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...