भारतातील सर्वात मोठी व्हॅक्सीन निर्माता कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने कोवीशील्डची किंमत कमी केली आहे. कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांनी बुधवारी ट्वीटरवरुन याबाबत माहिती दिली.
पुनावाला म्हणाले की, राज्यांना कोवीशील्ड आता 400 ऐवजी 300 रुपयांना मिळेल. यामुळे राज्यांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होईल. यातून ते जास्तीत-जास्त लस खरेदी करू शकतील आणि लोकांचे आयुष्य वाचवू शकतील.
केंद्राला 150 रुपयांना मिळत लस
21 एप्रिलला सीरमने व्हॅक्सीनच्या नवीन किमती ठरवल्या होत्या. तेव्हा खासगी रुग्णालयांसाठी लस 600 रुपयांना देण्याचे ठरले होते. यापूर्वी या रुग्णालयांना हीच लस 250 रुपयांना दिली जात होती. तेव्हा राज्यांसाठी दर 400 रुपये आणि केंद्रासाठी 150 रुपये होते.
एकूण प्रोडक्शनचा 50% राज्यांना दिला जातो
सीरममधून आता जितकी लस तयार होते, त्यातील 50% केंद्राच्या लसीकरण कार्यक्रमाला दिली जाते. उर्वरित 50% राज्य आणि खासगी रुग्णालयांना दिली जाते.