पुणे- सकाळी साडे आठ वाजल्या पासून कावळ्यांचा एकच आकांत चालू होता .. पण सकाळच्या गडबडीत कोणाला या कोलाहालाकडे लक्ष द्यायला वेळ होता ..
९ वाजता एकाने सांगितले ,’ एक कावळा कुठे तारेत कि मांजात अडकलाय .. पण मी माझ्या दररोजच्या कामाच्या शेड्युल लावण्यात गर्क होतो ,१० वाजता बाथरूम मध्ये गेलो तर खिडकीतून दूरवर एका दिसेनासे असलेल्या दोरीला एक कावळा लटकलेला दिसला , आता कावळ्यांचा कोलाहल हि थांबला होता. पण निट बारकाईने पाहिले , तो जिवंत होता , जीवाची तडफड त्याची सुरूच होती . मान इकडे तिकडे वळवून कोणी जणू मदतीला येतेय काय ? याकडे त्याची भेदरलेली नजर भिर भिरत होती.. आणि माझे अंतर्मन हेलावून गेले , बाथरूम मधून अर्धवटच तातडीने बाहेर येऊन पुतण्याला सांगितले अरे तो कावळा तिथे लटकलाय , झुंजतो आहे जीवासाठी ..गतप्राण नाही झालेला ..बघ त्याला सोडविता येतेय काय ? असे सांगून पुन्हा बाथरूम मध्ये आवरायला गेलो परत येईपर्यंत पुतण्याने प्रत्यक्षात पाहणी करून फोनोफोनी सुरु ठेवली होती .त्याची फोनोफोनी सुरु असताना समोरच्या रस्त्या पलीकडच्या बिल्डींग मधूनही कोणी प्रयत्न सुरु ठेवले होते , ते सकाळी साडेआठ पासून अलीकडे येऊन त्यांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला तो असफल झाला तरी त्यांचे प्रयत्न सुरु होतेच ,काही कावळे कुठून कुठून त्यांचा दाणापाणी आणून अडकलेल्या कावळ्याच्या चोचीत उडत येऊन भरून उडत जात होते फायरब्रिगेड शी वारंवार संपर्क साधून अखेरीस पुतण्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि अग्निशामक दलाची गाडी आपले जवान घेऊन आली, कात्रज चे स्टेशन ऑफिसर संजय रामटेके, जयवंत तळेकर ,संदीप घडशी ,पंकज इंगवले ,रमेश मांगडे ,संकेत शेलार अशी हि टीम कामाला लागली . पण हि गाडी काही करू शकणार नाही म्हणून त्यांनी एम एस इ डीसी एल ची गाडी मागविली पण या गाडी तूनही ७० फुट उंचीवर अडकलेल्या कावळ्या पर्यंत किंवा त्याला अडकविलेल्या मांजापर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसले , एकीकडे असे मानवी प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे तो स्वतःच मृत्यूशी झुंज देत सुटका करवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता . अखेरीस साडेबाराच्या सुमारास पुतण्या आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी शेजारील ७ मजली इमारतीच्या टेरेस वर पोहोचले आणि तिथून त्यांनी त्या’ मांजा ‘ पर्यंत पोहोचून तो हलवून इकडून प्रयत्न केले आणि तिकडून म्र्त्युशी झुज देणाऱ्या त्या जीवाला क्षणार्धात बळ मिळाले , भोवताली जखडलेला मृत्यूचा पाश बनलेला मांजा तून उसळी मारून त्याने झेप घेतली आणि रस्त्याच्या पलीकडील एका ‘अपूर्वाई ‘ नावाच्या बंगल्याच्या झाडात पुन्हा त्याच्या समवेत गेलेल्या मांजाच्या दोरीने त्याला जखडविले .. सुदैवाने हे झाड आणि ‘तो खाली बंगल्याच्या पोर्च मध्येच होता जिथे खाली असलेल्या फायर ब्रिगेड च्या जवानाने जाऊन त्या च्या शरीर भोवतालचा मांजा काढून त्याची सुटका केली . .. पण माणूस जवळ जाताच तो दूर जात होता .आणि इतर कावळे जे त्याभोवती घिरट्या मारत होते ..तेही आता जवळ नव्हते ,’अपूर्वाई ‘ बंगल्यावरून तो जणू वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या आणि अचंबित नजरेने त्याकडे पाहणाऱ्याकडे जणू कृतज्ञतेने पाहत होता ,पक्षीप्रेमी तोवर आले होते त्यांनी त्याला उपचारासाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही हातही लागत नव्हता . अखेरीस चला ,जीव तर वाचला.. याचं समाधान मानून , पुढे त्याचे नशीब म्हणून ..आम्ही आमच्या पुढच्या शेड्युल मध्ये बिझी व्हायला निघालो ..