मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी एम. विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री, जपान, रशिया, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, मॉरिशियस, सिंगापूर या देशाचे मुंबईतील वाणिज्यदूत उपस्थित होते. यावेळी श्री. गगराणी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.