पुणे-.माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रेखा टिंगरे या कळस धानोरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेळेस नगरसेविका राहिल्या आहेत.
रेखा टिंगरे ह्या 2007, 2012,2017 ह्या सलग तिन वेळा धानोरी-विश्रांतवाडी भागातून निवडून येत आहेत. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्काच आहे. रेखा टिंगरे यांचे भावकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे असुन,त्यांचे आपसात होत असलेले राजकारण याम्गे कारणीभूत असल्याचे अनेकदा सांगून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली काय ? यावरच चर्चा रंगू लागली आहे. रेखा टिंगरे यांची कन्या कोमल कुटे-टिंगरे ,पती यांनीही यापुर्वीच भाजपात प्रवेश केला होता. रेखा टिंगरे ह्या केवळ पक्षांअंतर्गत कायदा मुळे त्या राष्ट्रवादीत होत्या. आता नगरसेवकपदाचा कार्यकाळही पुर्ण झाल्याने त्यांनी प्रवेश केला. याबाबत रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला काहीही फरक पडणार नाही. त्यांना त्यांच्या भावी कारकर्दीस शुभेच्छा असे आमदार सुनिल टिंगरे यांनी म्हटले आहे.