समूहनृत्य स्पर्धेत विशेष मुलांची मनमोहक अदाकारी

Date:

पुणे : “विशेष विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे कार्यक्रम बसवून घेण्याचे काम जिकिरीचे असते. मात्र, शिक्षकांनी मेहनत घेऊन हे आव्हान लीलया पेलले आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच हा समूहनृत्याचा कार्यक्रम सुरेख झाला. विशेष मुलांची जिद्द आणि शिक्षक व पालकांची मेहनत यामध्ये मोलाची आहे,” असे मत लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ मधील सहकारी क्लब आयोजित मतिमंद गट समूहनृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी शहा बोलत होते. स्पर्धेत १७ शाळेतून एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळा व कार्यशाळा अशा दोन गटासाठी स्पर्धा होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सतीश राजहंस, सीमा दाबके, प्रतिभा खंडागळे, परिक्षक राजश्री नगरकर आणि मिथिला पंडित, कमल राजे, ललिता शिंदे, संध्या दहिवळे, ऋजुता पितळे, सुहास दाबके, माधुरी पंडीत, शमा गोयल उपस्थित होते.
समूहनृत्य स्पर्धेत कार्यशाळा गटात ‘सेवासदन दिलासा एरंडवणे’ या गटाने प्रथम क्रमांक, ओम साई ओम या गटाने व्दितीय क्रमांक, तर माधवी ओगले (व्यावसायिक विभाग) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस साई संस्कार निगडी व नव क्षितिज कार्यशाळा यांनी मिळवले. शाळा गटात कामायनी निगडी शाळेने प्रथम, सेवासदन दिलासा लक्ष्मीरोडने द्वितीय, तर साई संस्कार निगडीने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस सेवाधाम व छत्रपती प्रतिष्ठानचे निवासी विद्यालय यांनी मिळवला.

रमेश शहा म्हणाले, “समूहनृत्याचा हा इतका सुरेख कार्यक्रम बघताना भारावून गेलो. एकापेक्षा एक असे सरस कार्यक्रम या विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक वृंद आणि संस्था चालकांनी घेतलेली मेहनत विशेष कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहे.भविष्यात पुण्यातील सर्व विशेष शाळांतील शिक्षकांची एकत्रित सभा घेऊन जिल्हा पातळीवर या विशेष मुलांसाठी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”
विशेष मुलांचे कलागुण दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास, सांघिक भावना, व्यक्तिमत्व विकास साध्य करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरत असल्याचे सीमा दाबके यांनी प्रास्ताविकात सांगितले. अशाच कार्यक्रमातून ही विशेष मुले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सूत्रसंचालन प्रतिभा खंडागळे यांनी केले. कमल राजे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...