पुणे जिल्ह्यात आठ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर ,१८ ऑगस्टला मतदान, तर १९ ऑगस्टला मतमोजणी

Date:

पुणे-राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यांतील १२ नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ नगर परिषदा आणि दोन नगर पंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील बारामती ही अ-वर्गातील नगरपरिषद, तर खेडमधील चाकण व दौंड या ब-वर्गातील नगरपरिषदांचा समावेश आहे. तसेच क-वर्गातील नगर परिषदांमध्ये खेडमधील राजगुरुनगर व आळंदी आणि इंदापूर, पुरंदरमधील जेजुरी, सासवड आणि शिरूर या नगरपरिषदांचा समावेश आहे. नव्याने निर्मित झालेल्या आंबेगावमधील मंचर आणि बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, निवडणुकीसाठी ५ जुलै रोजी मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी २० जुलैला निवडणूक अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ ते २८ जुलै दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. २३ व २४ जुलै रोजी सुटी असल्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. २९ जुलै रोजी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जांची छाननी २९ जुलै रोजी करण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असून १८ ऑगस्टला मतदान, तर १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...