घराला घर पण देता देता..अखेर डीएसके पोलिस कोठडीतून ससून रुग्णालयात
पुणे :
घराला घरपण देणारी माणसं ..अर्थात डीएसके दांपत्य अटक झाल्यानंतर डीएसके
पोलीस कोठडीत असताना तोल जावून पडल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे. डीएसके दांपत्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डीएसके लॉकअप मध्ये असताना त्यांचा तोल गेला आणि त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तात्काळ उपचारासाठी ससून मध्ये दाखल करण्यात आले आहे.खडतर परिस्थितीतून मेहनत करता करता एक नामांकित आणि यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी घेतलेली उत्तुंग भरारी .. आता अधोगती कडे कशी वाटचाल करू लागली .. यामागे नेमके काही रहस्य दडलेले आहे काय ? अशा विविध प्रश्नांचा खल .. मनातल्या मनातच विरला जाणार आहे काय ? अशा प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देवू शकणार आहे .
डीएसके यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात अपयश आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. शनिवारी पहाटे दिल्ली येथून अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते.
असंख्य कार्यक्रमातून उपक्रमातून समाजातील विविध स्तरावर आपल्या यशस्वी कारकिर्दीचा ठसा उमटविलेले डीएसके आणि त्यांची पत्नी यांची ही खडतर वाटचाल …मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील अपघातापासून सुरु झाली .त्यांनी हायवे च्या प्रकल्पासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित करत आक्षेप नोंदविले होते .मोठमोठ्या रकमेच्या जाहिराती ,विविध संस्थाना देणग्या,आणि सिलेब्रिटी सह मोठमोठे कार्यक्रम सातत्याने राबविणाऱ्या डीएसके यांची नोटबंदी नंतर त्यांची समस्या मोठी बिकट होत गेली .
ठेवीदारांचे … आणि फ्लॅट बुकिंग करणाऱ्यांचे पैसे गेले कुठे ?डीएसके यांच्या अधोगती मागे नेमके कोणते कारण आहे ? आशा स्वरूपाची अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत .
अनेक बड़ी बड़ी माणसे गैरव्यवहार च्या आरोपावरून कारागृहात खितपत पडली आहेत .त्यांच्याबद्दल एवढी नव्हती पण जनमानसात मात्र काही प्रमाणात डीएसके यांच्याबद्दलआश्चर्य , सहानुभूति ,कुतूहल असल्याचे दिसते आहे.
भारतात आणि भारताबाहेर आपल्या विश्वासार्ह , आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या उद्योगांचे जाळे पसरविलेले डीएसके जर केवळ नोटबंदीमुळे अडचणीत आलेत यावर काहीजण अनेक उपप्रश्न निर्माण करतात . त्यांची एकूण संपत्ती आणि देणी या गोष्टींबाबत देखील नाना प्रकारची कुतूहले व्यक्त होतात . या साऱ्या पार्श्वभूमीवर डीएसके यांच्या अधोगती मागे काही रहस्य दडले आहे काय ? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होणार आहे .