वंचितांच्या दिवाळीला माणुसकीचा आधार

Date:

श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट कडून दिवाली फराळाचे वाटप 
पुणे प्रतिनिधी – सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट चे कार्याध्यक्ष दिपक निकम यांनी पुढाकार घेतला. शहरात ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे. 
शहरातील वारजे, कर्वेनगर, कोथरूड, कर्वे रोड, पौड, लॉ कॉलेज, पौड फाटा, डेक्कन, शनिवार वाडा, मनपा, सिंहगड रोड, शिवाजी नगर परिसरा जाऊन ५०० पॅकेट फराळ वितरण केले. त्यात लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, चखली इ. चा सामावेश होता.
रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवला असल्याचे दिपक निकम यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष दीपक निकम गणेश मंडळ अध्यक्ष सचिन पवार तर सदस्य केतन गायकवाड, सूरज जाधव, गणेश शेलार, मंगेश सुपेकर, सुनील तेलंग, आकाश पाडेकर, रोहित घाणेकर, राज पेंढारे, तुषार ठोकळे, साहिल सुपेकर, गणेश मोरे यांनी परिश्रम घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...