Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव समितीची बैठक संपन्न

Date:

पुणे दि. 29 : लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दिलेल्या सिंहगर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त
महाराष्ट्र शासनातर्फे सन 2016-17 मध्ये लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव असे विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र मुठे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील गणेश मंडळ पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक पार पडली. सदर बैठकीस शासनातर्फे गठीत लोकमान्य महोत्सव समितीच्या सदस्या श्रीमती मुक्ताताई टिळक, श्री. सुरेश सरनोबत यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत सदर विविध कार्यक्रम राबविणेबाबत सांगोपांग चर्चा करणेत आली.
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान अंतर्गत जिल्हयातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्पर्धा
आयोजित करुन गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतु:सुत्री तसेच अन्य
उपक्रमांव्दारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेश मंडळांची स्पर्धा आयोजित करुन गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळांची पध्दत देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदि विषयांबाबत मुल्यांकन करुन शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा ,‍विभागीय स्तरावर दिलेल्या मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेसाठीचे अर्ज ग्रामीण भागाकरीता तालुका गटक्षणाधिकारी यांचेकडे शहरी भागाकरीता
महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी यांचेकडे दिनांक 4 सप्टेंबर 2016 पर्यंत जमा
करावयाचे आहेत. तालुका, जिल्हा व ‍विभागीय स्तरावरील समितीमार्फत प्रथम, ‍व्दितीय व तृतीय
क्रमांकासाठी बक्षिसे देवून गौरव करण्यात येणार असून याकरीता मुल्यांकन पध्दती निश्चित करणेत आली आहे.सदर समितीमार्फत दिनांक 8 सप्टेंबर 2016 ते 12 सप्टेंबर 2016 पर्यंत समिती सदस्यांमार्फत भाग घेतलेल्यामंडळांचे परिक्षण व मुल्यांकन करणेत येणार आहे.
सदर बैठकीत उपस्थित मंडळांनी सक्रीय सहभाग घेणेचे आश्वासन दिले  शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. हरुन आतार, पोलीस उपायुक्त्‍ श्री. बरकत मुजावर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...