सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी

Date:

पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये सहभागी होत आहेत. आज मध्यवर्ती इमारत येथे सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांच्या हस्ते व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांचे प्रमुख उपस्थितीत या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.

सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वतीने पालखी सोहळ्यामध्ये चित्ररथ काढण्यात आला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ आज मध्यवर्ती इमारत येथे झाला. सामाजिक वनीकरण, वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती या चित्ररथांमधून कलापथक, मनोरंजनात्मक जादूचे प्रयोग यांचे माध्यमातून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपवनसंरक्षक श्रीमती ए. श्रीलक्ष्मी, विभागीय वन अधिकारी नारनवर, विभागीय वन अधिकारी दिलीप घोलप, विभागीय वनअधिकारी रामदास पुजारी, सहाय्यक वनसंरक्षक सामक, पुराणिक, निकम, वनक्षेत्रपाल गौरी बो-हाडे, संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा या दिंडीचे इंगोले महाराज यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येडवे – बिदरकर गुरूजींच्या कलापथकाने 33 कोटी वृक्ष लागवड योजना, कन्या वन समृद्धी योजना, हरित सेना व इतर शासकीय योजनांबाबत माहिती उत्कृष्टपणे सादर केली तर जादूगार सोमनाथ पाटील यांनी जादूच्या मनोरंजनात्मक प्रयोगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती केली.

वारक-यांशी व उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. दिनेशकुमार त्यागी यांनी “ वृक्ष हेच आपले जीवन असून, वृक्ष आपल्याला जीवनावश्यक प्राणवायू देत असल्याने प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहीमेमध्ये सहभागी होऊन वृक्ष लागवड व संगोपन केले पाहिजे ” असे त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...

”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि क्रीडा...

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...