Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवजयंती उत्सव पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे– जिल्हाधिकारी सौरभ राव

Date:

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त दि. 19 फेब्रुवारी 2018 रोजी शिवनेरी किल्यावर होणारा शिवजयंती उत्सव योग्यरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2018 रोजी शिवनेरी किल्ल्यावर  शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. यावेळी आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.

श्री.राव म्हणाले, शिवजयंती कार्यक्रमाची रुपरेषा सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग व पर्यटन विभागांनी ठरवावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ सुशोभिकरण, गडावरील साफ-सफाई तसेच गडावरील आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबाबतचे नियोजन महसूल, पुरातत्व विभाग व राज्य विद्युत वितरण महामंडळाने करावे. रस्त्यांची  डागडूजी  तसेच हेलिपॅड, स्टेज व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. शिवजयंती कार्यक्रमास गडावर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित रहाणार असल्यामुळे गडावरील परिसर व कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन पोलीस विभागाने करावे, असेही श्री. राव यांनी नमूद केले.

आमदार सोनवणे म्हणाले, शिवजयंती कार्यक्रम योग्य रितीने पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहकार्य करावे. महोत्सव कालावधीमध्ये चित्रकला, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा  व अन्‍य विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असून याचे नियोजन सबंधित विभागांनी करावे.

बैठकीस सबंधित विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...