–
पुणे : धकाधकीच्या जीवनशैलीत योगामुळे प्रत्येकाची कार्यक्षमता व कार्यकुशलता वाढते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज केले.
येथील अल्पबचत संकुलात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतजली योग समितीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित योग प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राव बोलत होते. यावेळी उपायुक्त कविता व्दिवेदी, उपायुक्त (महसूल) ज्योतीबा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, तहसिलदार रोहिणी आखाडे, राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष श्री. पचारणे, पतंजली योग समितीचे योग प्रशिक्षक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राव म्हणाले, योग साधना ही भारतीय परंपरेचा अविभाज्य घटक आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सामान्यांच्यात योगा बाबत प्रेम व आपुलकी निर्माण होण्यास मदत होणार आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी योग साधना अत्यंत उपयुक्त आहे. पुढील सहा महिन्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांसाठी योग शिबीराचे नियमीत आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगाचा सराव केला.