पुणे विभागातील 17 लाख 67 हजार 413 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 41 हजार 898 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 30 : पुणे विभागातील 17 लाख 67 हजार 413 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 41 हजार 898 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 516 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 83 हजार 24 रुग्णांपैकी 10 लाख 55 हजार 410 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 420 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 182 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 17 हजार 306 रुग्णांपैकी 2 लाख 3 हजार 295 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 771 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 75 हजार 698 रुग्णांपैकी 1 लाख 67 हजार 559 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 597 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 73 हजार 282 रुग्णांपैकी 1 लाख 61 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 369 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 590 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 92 हजार 588 रुग्णांपैकी 1 लाख 79 हजार 826 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 359 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 403 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 154 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 158, सातारा जिल्ह्यात 1 हजार 73, सोलापूर जिल्ह्यात 609, सांगली जिल्ह्यात 631 तर कोल्हापूर जिल्ह्यात 683 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 521 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 184, सातारा जिल्हयामध्ये 694, सोलापूर जिल्हयामध्ये 532, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 75 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 136 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 26 लाख 93 हजार 124 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 41 हजार 898 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 29 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)