“क ” आणि “ड” आश्रम शाळांची सुनावणी घेऊन 10 दिवसात अहवाल द्यावा

Date:

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे 100 टक्के समायोजन झाल्याशिवाय नवीन पद भरतीस मान्यता नाही

पुणे, दि.१३:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार दिले.इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संचालक दिलीप हळदे, सहसंचालक डी. डी. देशमुख, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळकी, उपसंचालक जयश्री सोनकवडे, सहायक आयुक्त सोलापूर कैलास आढे, पुणे संगीता डावखर, कोल्हापूर विशाल लोंढे, सातारा नितीन उबाळे उपस्थित होते.प्रारंभी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री श्री वडेट्टीवार यांनी पुणे विभागातील प्रलंबित प्रकरणाची माहिती घेतली. श्री वडेट्टीवार म्हणाले, विभागातील ‘क’ आणि ‘ड’ आश्रमशाळांची सुनावणी घ्यावी. आश्रमशाळाची तपासणी करुन 10 दिवसात अहवाल संचालकांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. मागील सहा महिन्यापासून बंद असलेल्या परंतु त्यावर प्रशासक नेमलेल्या आश्रमशाळेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत.

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. भाडे तत्वावरील सुरु करावयाचे मुला-मुलीचे वसतीगृह सुरु करण्याबाबत तात्काळ आदेश काढावे, प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणाचे प्रस्ताव शासनकडे सादर करावे, अशा सूचना दिल्या.
अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन झाल्याशिवाय नवीन पदभरतीस मान्यता देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत मंत्री श्री वडेट्टीवार यांनी घरकुल योजना, तांडा वस्ती बृहद आराखडा इत्यादी विषयाचा आढावा घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...

टाटा एआयएने आणले ‘एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड्स’

प्रियजनांची सुरक्षा आणि भविष्यातील प्रगती: गुंतवणुकीचा सर्वात स्मार्ट मार्ग हा...

रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सव दि. २० फेब्रुवारीपासून

धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार पुणे...

इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीच्या भुपेश अशोक दिक्षीतवर गुन्हा दाखल

पुणे- कोरेगाव पार्क येथील इन्फिस्को शेअर मार्केट...