पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 829

Date:

पुणे विभागातील 5 लाख 40 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 63 हजार 612 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 5 लाख 40 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 63 हजार 612 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 829 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.83 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 62 हजार 979 रुग्णांपैकी 3 लाख 48 हजार 118 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 6 हजार 135आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.91 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 368 रुग्णांपैकी 51 हजार 981 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 145 रुग्णांपैकी 46 हजार 589 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 593 रुग्णांपैकी 45 हजार 670 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 190 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 527 रुग्णांपैकी 47 हजार 772 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 781 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 544, सातारा जिल्ह्यात 134, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 181 आहे. पुणे जिल्हयामध्ये 832, सातारा जिल्हयामध्ये 179, सोलापूर जिल्हयामध्ये 136, सांगली जिल्हयामध्ये 12 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 22 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 8 हजार 575 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 63 हजार 612 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“मोफत पाणी” टँकर चा महाघोटाळा… खर्डेकर यांचे आयुक्तांना साकडे

पुणे:पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथील बंद मीटर चा घोळ...

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...