Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शूरा मी वंदिले . . .! पालकमंत्र्यांनी वाहिली वीरमरण प्राप्त पोलिसांना आदरांजली

Date:

पुणे : आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण प्राप्त झालेल्या पोलिस दलातील शहीदांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज आदरांजली वाहिली.
पोलिस स्मृतिदिनानिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पाषाण येथील पोलिस संशोधन केंद्राच्या प्रांगणात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिस स्मृतिस्तंभास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. दि. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ याकालावधीत देशातील सर्व राज्यातील पोलिसदलातील एकुण ४७३ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावत असताना वीर मरण प्राप्त झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पोलिस हवालदार नानजी बारकू नागोसे, विलास विठोबा शिंदे, नितीन श्रीधर परब, पोलिस शिपाई बंडू धिसू वाचानी व दिपक मुकुंद सदमके या पाच पोलिस जवानांचा समावेश आहे.
यावेळी पोलिसदलातर्फे प्रारंभी शोकशस्त्र करुन वीरगती प्राप्त पोलिस अधिकारी व शिपायांची नावे वाचण्यात आली. जनरल सॅल्युट झाल्यानंतर हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून पोलिस दलाच्या वतीने मानवंदना दिली गेली. पोलिस बँडच्या पथकाने लास्ट पोस्ट ही धून बिगूलवर वाजवली.
लडाख येथील हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या भागात गस्त घालणाऱ्या केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या १०शिपायांना चिनी सैनिकांच्या हल्लयात निकराची लढत देताना २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी वीरमरण प्राप्त झाले तेंव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील पोलिस दलाच्या वतीने पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.
स्मृतिदिनाच्या कार्यक्रमास पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त सुनील रामानंद,पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. परेडचे संचलन सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....