पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या ॲक्टीव रुग्ण 11 हजार 51

Date:

पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 31 हजार 31 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:-पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 31 हजार 31 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 11 हजार 51 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 600 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 25 हजार 732 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 15 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 560 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 420 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.71 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.14 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 334 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 174, सातारा जिल्ह्यात 43, सोलापूर जिल्ह्यात 86, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1188 रुग्ण असून 757 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 383 आहे. कोरोनाबाधित एकूण 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 813 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 724 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 813 आहे. कोरोना बाधित एकूण 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 410 रुग्ण असून 254 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 144 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 888 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 151 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 88 हजार 313 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 84 हजार 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 153 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 52 हजार 781 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 31 हजार 31 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जीवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, ७.०९ लाखांचा...

आंबेगावमध्ये पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात गेल्या २४ तासांत विविध प्रकारचे...

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

विद्यार्थ्यांनी भारतीय मूल्ये, नैतिकता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगभरात...

…तर राजीनामा द्या अन् संघात जा:RSS च्या कार्यक्रमाला गेलेल्या IPS विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई-नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय...