प्रियांका कुदळे आणि उमेश कचरे यांचा सत्यशोधक विवाह संपन्न

Date:

सातारा- फुले शाहू आंबेडकरएज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे 21मे2019 रोजी दुपारी 1 वाजता वावरहिरे , महादेवदरा येथे सत्यशोधक उमेश कचरे आणि सत्यशोधिका प्रियांका कुदळे यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक विवाह महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले साहित्य समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ श्रीरंग ढोक यांनी स्वतः जमवून महात्मा फुले यांचे वेशभूषेत मोफत लावला.
या विवाह प्रसंगी ढोक यांनीसत्यशोधक विवाह का, कसे,आणि कसा करावा या विषयी मौलिक माहिती देऊन सद्या भयानक दुष्काळ असताना अक्षता म्हणून तांदळाची नासाडी सर्वत्र करतो आहोत हे चुकीचे असून ही प्रथा पूर्ण बंद करून अक्षता म्हणून फुले वापरावेत असे आवाहन केले.,फुले वापरल्याने लोकांना रोजगार मिळेल .पुढे असे देखील म्हणाले की पालकांनी आपल्या वधु वरांचे सामुहिक सत्यशोधक विवाहसोहळ्या मध्ये सहभाग घेऊन नाहक खर्च वाचविला पाहिजे.क्षणिक डी. जे.ऑर्केस्ट्रा व इतर खर्च वाचवून तो पैसा आपल्या संसाराला उपयोगी पडेल याकडे पहावे. दुसर्याने मोठा खर्च केला म्हणून आपण कर्जबाजारी होऊ नये असे म्हंटले.
या वेळी आकाश ढोक यांनी वावरहिरे पंचक्रोशीत सावतानगर येथे सर्व समाजातील वधु वर यांचे साठी आधुनिक सोयी सुविधा सह मोफत बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र चालू केले असून गरजवंतानी लाभ घ्यावा व इतरांना माहिती द्यावी असे आवाहन केले.
यावेळी या सत्यशोधक विवाहात कचरे कुटुंबाने अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरल्या त्या बद्दल त्यांचे सरपंच चंद्रकांत वाघ ,पोलीस निरीक्षक नवनाथ कुदळे व अनेकांनी अभिनंदन केले.
सत्यशोधक विवाहाला सुरवात करताना वर उमेश कचरे यांचे शुभहस्ते थोरसमानसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि वधु प्रियांका कुदळे हिच्या हस्ते भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी महात्मा फुले रचित मंगलाष्टक सामजिक कार्यकर्ते बाजीराव वाघ आणि सुरेश बोराटे यांनी गाऊन चांगले वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी वधु वर यांना रघुनाथ ढोक आणि सौ आशा ढोक यांचे हस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.या विवाहासाठी वावरहिरे व वालचंदनगर पंचक्रोशीतील तसेच पुणे, मुंबई परिसरातील सर्व समाज आणि ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वी करणेकरिता बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राचे सौ आशा ढोक,आकाश-क्षितिज ढोक ,अशोक राऊत ,सौ.कोमल ढोपे यांनी सहकार्य केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात

एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १०...

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.…..

-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई- संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे...

मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके

पुणे, दि. 13 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना...

मतदानासाठी भरपगारी सर्वांनाच सुट्टी

पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निडणूकीसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी...