ज्येष्ठ अभिनेते ‘धर्मेंद्र’ यांच्या ‘सहस्त्रचंद्रदर्शन’ सोहळ्याचे आयोजन
पुणे: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकतेच ८० वर्ष पूर्ण केले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने संपूर्ण भारतातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. अशा हूरहुन्नरी आणि चतुरस्त्र हिंदी चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांच्या ‘सहस्त्रचंद् रदर्शन’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा धर्मेंद्र यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक १२ जानेवारी सायंकाळी ७:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडेल.
या सोहळ्यामध्ये धर्मेंद्र यांची थेट मुलाखत तसेच त्यांच्याशी दिलखुलास गप्पाही मारता येतील. तसेच, ‘पल पल दिल के पास’ या त्यांच्या चित्रपट जीवनाशी निगडीत गीत- मालेचा ऑडीओ व्हिज्युअल कार्यक्रमदेखील यावेळी होईल. अली हुसेन, प्रशांत नासेरी, धवल चांदवडकर, जितेंद्र भूरूक, रेश्मा मुखर्जी, अर्चना सुतार, प्रिया जोशी असे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांची गाणी गातील. तसेच विवेक परांजपे हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजक असतील. अशा अष्टपैलू अभिनेत्याच्या पूर्वस्मृतींना हे सर्व कलाकार आपल्या गाण्यांच्या माध्यमातून उजाळा देणार आहेत. हे सर्व साकार करताना संदीप पाटील हे खुद्द धर्मेंद्र यांच्याशी संवाद साधून त्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा करतील. या सोहळा रसिक पुणेकर प्रेक्षकांसाठी एक अनोखी सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.