दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

Date:

मुंबई – इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.  याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरील परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे.  त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड यांनी केले आहे.

सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा असेही मंत्री श्रीमती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आवर्जून नमूद केले आहे.

दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री, प्रा. गायकवाड यांनी केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करू; आ. नीलम गोऱ्हे

शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात २५० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रे पुणे: शस्त्रांची...

रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी! वाढत्या आगीच्या घटनांनंतर महापालिकेचा मोठा निर्णय

दिवाळीच्या दिवशी आगीच्या १४२ वर्दी; त्यापैकी १३७ घटना फटाक्यांशी...

‘ अराजकवादी कोण? आम्ही कि तुम्ही ’ मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

‘गोकुळ’वर सत्तेच्या जोरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न; भाजपकडून लोकशाही मूल्यांची...

फटाक्याच्या स्फोटात १० वर्षीय मुलाचा करुण अंत!

ऐन दिवाळीत दिल्लीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; रुग्णालयावर कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा...