समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल कलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

  • मराठी रंगमंच कलादालन स्वयंपूर्ण-सक्षम होईल असा आराखडा निश्चित.

मुंबई, दि. ५ : – मराठी रंगभुमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभुमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगमंच कलादालनाच्या उभारणीचा आराखडा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निश्चित करण्यात आला.

कलादान स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्याचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे तसेच बिर्ला क्रिडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास व कलादालनाच्या निर्मितीकरिता स्थापन समितीचे सदस्य अभिनेते सर्वश्री आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह अन्य शासकीय सदस्य आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल, असे नियोजन व्हावे. याठिकाणी नाटक पाहता येईल, पण प्रेक्षकाना मराठी रंगभूमीची वाटचालही अनुभवता येईल. ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र तर व्हावेच, पण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे. संग्रहालय आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हावे असे नियोजन आतापासूनच करण्यात यावे.
कलादालनामध्ये अत्य़ाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासस दृकृ-श्राव्य संग्रहालय, त्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबराबरोच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भ, दस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.
या कलादालनासाठी १७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आराखडा निश्चिती तसेच विविध संकल्पना आणि कार्यान्वयनांसाठी १० कोटीं रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
अठरा दालने आणि अद्ययावत सभागृह, ग्रंथालय अशा विविध सुविधांनी युक्त असा या कलादालनाबाबचा आराखडा वास्तू रचनाकार शशांक मेहंदळे, पराग केंद्रेकर यांनी सादर केला, चर्चेअंती हा आराखडा निश्चित करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...