Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

घनकचरामुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Date:

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील 141 शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकट्या महाराष्ट्रातील 76 शहरांचा यात समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पंचतारांकित तर 34 शहरांना तीन आणि 41 शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे.

केंद्र शासनाच्या नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2018 पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो . केंद्रीय नागरी विकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष 2019-20 साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहरांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील 4 हजार 372 शहरांपैकी 1435 शहरांनी आवेदने पाठविली होती. यापैकी डिजिटल एमआयएस चाचणीत 698 शहर बाद ठरली. उर्वरित 737 शहरांमध्ये नागरिकांचे मत व मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण 20 मानकांआधारे चाचणी करून अंतिम 141 शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 76 शहरांनी बाजी मारली आहे. देशातील 6 शहरांना पंचतारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील 65 शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील 34 शहरांचा यात समावेश आहे. देशभरातील 70 शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील  41 शहरांचा यात समावेश आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील  महानगरपालिका, नगरपालिका खालील प्रमाणे.

पंचारांकित मानांकन

नवी मुंबई महानगर पालिका

तीन तारांकित मानांकन

अंबरनाथ,भिवंडी निजामपूर, ब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गड‍हिंगलज, इंदापूर,जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि  विटा

एक तारांकित मानांकन

अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई,  जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूर, कुरुंदवड, महाड,  मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे,  उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.

राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले  वर्चस्व निर्माण केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणाऱ्या एकूण गुणांपैकी 25 टक्के म्हणजे 6000 पैकी 1500 गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्त्व असून यात महाराष्ट्राची सरशी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...