नवी दिल्ली, 7 डिसेंबरः
लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बी एस राजू उद्यापासून 10 डिसेंबरपर्यंत मलेशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघणार आहेत. भारत आणि मलेशिया यांच्यात सध्या अतिशय चांगले संरक्षण विषयक सहकार्य आहे. लष्कर उपप्रमुख आपल्या भेटीदरम्यान मलेशियाचे वरिष्ठ लष्करी आणि नागरी नेत्यांसमवेत अनेक बैठका करून त्या माध्यमातून संरक्षण विषयक सहकार्य आणखी पुढे घेऊन जातील.
मलेशियन लष्कराचे उपप्रमुख आणि तेथील सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ यांच्याशी उपप्रमुख चर्चा करणार असून परस्पर हिताच्या निर्णयांवर आपापल्या विचारांची देवाणघेवाण करतील. मलेशियन संरक्षण आणि सामरिक नीती अभ्यासविषयक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशीही उपप्रमुख व्यापक चर्चा करतील. 9 डिसेंबर 2022 रोजी, उपप्रमुख सध्या सुरू असलेल्या हरिमाऊ शक्ती या संयुक्त सरावांदरम्यान विविध प्रकारच्या प्रशिक्षण उपक्रमांचीही पहाणी करतील आणि सैनिकांशी संवाद साधतील.
उपप्रमुखांच्या या भेटीमुळे दोन्ही लष्करांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक सखोल होतील आणि अधिक निकटचे सहकार्य तसेच सामरिक मुद्यांवर दोन्ही देशांतील सहकार्य वाढवण्यासाठी प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल.