Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिल्लीत पोलिसांकरवी होतो आहे , राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा छळ ?

Date:


पुणे- दिल्लीत होणाऱ्या घडामोडींबाबत च्या येणाऱ्या बातम्या पहाता आणि ऐकता, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची दिल्ली पोलीसांकरवी  मोदी सरकारने छळवणूक सुरु केल्याची भावना येथे जनतेत पसरते आहे . निवृत्त जवानाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे orop म्हणजे वन रँक वन पेन्शन बाबत सरकार सैनिकांबाबत देखील निर्णय लवकर घेत नसल्याची भावना पसरली आहे . एक तर या पूर्वी सैनीकांची वेतन पद्धती यावर देखील यापूर्वी हलकीशी झलक लोकांच्या कानावर गेलेली असताना याबाबत सरकार केवळ सैनिकांच्या ‘ मृत्यू चे किंवा शहीद होण्याचे किंवा शौर्याचे राजकीय भांडवल करीत आहे अशी काँग्रेस जणांची भावना आता जनतेत देखील पसरत आहे काय? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे .या पार्श्वभूमीवर दिल्लीत दस्तुरखुद्द इंदिरा गांधींचा नातू , राजीव गांधींचा पुत्र आणि गांधी घराण्याचा राजकुमार अशी प्रतिमा असलेल्या राहुल गांधींना प्रत्यक्षात पोलिसांनी अडविणे , त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवणे , किंवा वारंवार ताब्यात घेतल्याच्या बातम्या येणे,म्हणजे मोदी सरकार ची दमदाटी अत्युच्च पातळीवर पोहोचत आहे काय? असा देखील प्रश्न सामान्य माणसाला भेडसावीत आहे . आम आदमी चे केजरीवाल अगोदरच मोदींच्या वावटळात आपली नौका हाकीत आहेत, असे देखील  मत आहे  . त्यात आता ही भर पडल्याने मोदी यांच्या एकूण राजकीय भूमिकेबाबत संशयाचे वलय जनतेत निर्माण होऊ पाहत आहे . काँग्रेस ला लोकसभा आणि अन्य निवडणुकीत जनतेने नाकारले असले, तरीही गांधी घराण्याबद्दल भारतवासीयांच्या मनात आपुलकीचे आणि आदराचे स्थान आहे , जे अद्याप कोणीही मिळवू शकलेले नाहीत कदाचित भाजप देखील मिळवू शकणार नाही, अशी भावना आहे . पण थेट दिल्ली पोलीस आणि राहुल गांधी अशी चकमक आता भासू  लागल्याने जनतेत याबाबत प्रक्षोभ उसळू शकतो असे  मत बनू पहात आहे .
दरम्यान -ज्या अहंकाराने  काँग्रेसला बुडवले तोच अहंकार भाजपलाही बुडवेल अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केली आहे. मी पोलिसांच्या अटकेला घाबरत नाही, पण पोलिसांनी रामकिशन ग्रेवाल  यांच्या कुटुंबीयांना का अटक केली होती?  हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले आहेत.
तर राहुल गांधी यांना संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी अडवून ठेवले त्याबाबत राहुल गांधी काय म्हणतात हे दाखविणारी आणि ऐकवणारी व्हिडीओ क्लीप देखील लोकांच्या मनात घरघर  करू शकणार आहे .. पहा ही व्हिडीओ क्लीप….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...