पुणे- 17 पैकी 16 गुन्ह्यात ..निर्दोष ..मग मोका कसा लावला …? शिवसृष्टी साठी आवाज उठवला म्हणून कि आणखी काही राजकीय कारणांनी काटा काढायचा म्हणून दीपक मानकर यांचा राजकीय घात करण्यात आला ? हि शहरभर राजकीय वर्तुळात कित्येक दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा होते आहे .पण जाहीर बोलण्याची हिम्मत कोणी केली नाही … आज अखेर महापालिकेच्या नव्या .. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कॉंग्रेस चे गट नेते अरविंद शिंदे या वर आवाज उठविला ..वाचा फोडली …