पुणे-
संतूर वाद्याला जगमान्यता मिळवून देणारे भारतीय संगीतकार प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे संगीत -सांस्कृतिक जगताची मोठी हानी झाली आहे,अशा शब्दात पुणे महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी श्रद्धांजली वाहिली आणि २०१५ मध्ये त्यांनी पुण्याला दिलेल्या विशेष भेटीच्या आठवणींना उजाळाही दिला. संतूर हे वाद्य जगप्रसिद्ध करण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे योगदान मोठे होते. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासमवेत पुण्याला भेट दिली होती. शिवदर्शन येथील कै.वसंतराव बागुल उद्यानातील भारतरत्न भीमसेन जोशी कलादालनात पुणे मनपाच्यावतीने तत्कालीन उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून मॅड मॅपिंग या अनोख्या प्रकल्पात पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे उत्तम वेशभूषेतील सुमारे साडेतीन फुट उंचीचे फायबरचे बैठे पुतळे बसविण्यात आले. त्यावेळी पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी स्वतः उदघाटनाआधी भेट देऊन या प्रकल्पाचे आणि संकल्पनेचे कौतुक केले होते.हे पुतळे स्वतः प्रत्यक्ष बोलत असल्याचा भास होतो, काही क्षण कळलंही नाही, इतके हुबेहूब पुतळे आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद कायम स्मरणात आहे ,अशी भावना आबा बागुल यांनी व्यक्त केली.
डॉ.पं.नंदकिशोर कपोते म्हणाले,’पं. शिवकुमार शर्मा व माझे ३० वर्षा पासुन संबंध होते. माझी व पं.शर्मां ची पहीली भेट ताशकंद (रशिया) ला झाली.त्या वेळी मी पं. बिरजू महाराज जीं समवेत नृत्य कार्यक्रमासाठी तेथे गेलो होतो. दोन दिवस आम्ही एकत्र होतो. पं.शर्मा जीं चा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व विनोदी होता. त्यांनी माझे नृत्य पाहीले ,कौतुक केले व आशीर्वाद दिले.तो दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या नंतर पं.शर्मां शी अनेक वेळा भेट झाली. ते मला ‘नंदू’ म्हणायचे.
माझी शेवटची भेट पुण्याजवळ हाडशी येथे झाली.त्यावेळी तेथे सत्य साई बाबा आले होते व पं.शिवकुमार शर्मा त्यांच्या दर्शनासाठी आले होते. मलाही दर्शनासाठी आलेले पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी माझी आवर्जून विचारपूस केली मी त्यांच्या पाया पडुन आशीर्वाद घेतले.
पं.शिवकुमार शर्मा यांनी संतूर या दुर्मीळ वाद्याला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक शिष्य तयार केले.
पं.शिवकुमार शर्मा यांच्या अकस्मित जाण्यामुळे कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कलाविश्व पोरके झाले आहे .कला क्षेत्रातील तेजःपुंज दैद्विप्यमान तारा निखळला आहे.ईश्वर पं.शिवकुमार शर्मा यांच्या आत्म्यास शांती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ज्या ज्या वेळी संतूर वाद्याचे नाव निघेल त्या त्या वेळी पं.शिवकुमार शर्मा यांचे स्मरण होत राहील. शत शत नमन.
डॉ.पं.नंदकिशोर कपोते
प्रसिद्ध कथक नर्तक
मो: 9371099911