माजी गुणवंत विद्यार्थीनींची सेलिब्रिटी म्हणून उपस्थिती
पुणे, 18 ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा आला रे आला… सह अनेक प्रसिद्ध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी ताल धरला.
दहीहंडी उत्सवाचे वैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण शाळेच्या माजी विद्यार्थीनी होत्या. या विद्यार्थिनींना सेलिब्रिटी म्हणून शाळेने निमंत्रित केले होते. राष्ट्रीय खो-खो खेळाडू अर्पिता ठाकूर, उद्योजक अबोली फाळके, डॉ.श्वेता शिंदे यांची सेलिब्रिटी म्हणून आजच्या दहीहंडी उत्सवास उपस्थिती होती.
चित्रपटसृष्टीतील तारेतारकांना सेलिब्रिटी म्हणून पाहण्याची आपल्या सर्वांना सवय असते. अशा परिस्थितीत आपल्याच शाळेच्या गुणवंत माजी विद्यार्थीनीच सेलिब्रिटी म्हणून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याचे फार कौतुक होते.
म्हसोबा दहीहंडी संघ कसबा पेठ पुणे यांनी शाळेची दहीहंडी फोडली. यावेळी शिक्षण संचालक नरहरी पाटील, प्राचार्य अमर क्षीरसागर, शोफिमान, लक्ष्मी कुलकर्णी, डेनसिंग, अर्जुन शिंदे, पांडुरंग जगताप, सुरेश पाटील, मनीषा तिरकुंडे, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.