दही हंडी ..जळीतग्रस्तांच्या मदतीला धावली

Date:

पुणे-वाजत गाजत नाचत आणि जल्लोषात दही हंडी फोडण्याचा उत्सव एकीकडे शहरभर होत असताना दुसरीकडे दहीहंडीचा खर्च टाळून वस्तीतील जळीतग्रस्तांना भांडीकुंडी व एक महिन्याचे किराणा माल आणि अन्य जीवनावश्यक साहित्य मदत म्हणून देण्याचा उपक्रम गणेश शेरला नावाच्या भाजपा कार्यकर्त्याने राबविला
स्व. मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये प्रमिला किशोर बाबुळकर यांच्या घराचे आग लागून आर्थिक नुकसान झाले होते. या जळीतग्रस्तांना मंडळाने मदत करण्याचे विचार करून सर्वांनी एकत्र येत गणेश शेरला यांच्या मदतीने एक महिन्याचे राशन (धान्य किट) , आवश्यक भांडीकुंडी अशी बाबुळकर कुटुंबाला मदत केली.एकता तरुण मित्र मंडळाने याबाबत विचार करून दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित केले आणि वस्तीतील जळीतग्रस्तांना मदत केली. या मदत कार्यात सामाजिक कार्यकर्ते संतोषभैय्या मोरे, सावरकर नगर कार्यवाह राहुल लोंढे, हरीष पुटगे, नितीन गायकवाड,विशाल सांळुखे,अनवर उर्फ पापा शेख,महेश सांळुके,अमोल अरकल सह सहकाऱ्यांनी मदत केली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर; १६ एप्रिलचे विधेयक देश तोडणारे: नाना पटोले

भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; मुंबई, दि. २४ एप्रिल २०२६. भारतीय जनता...

भाजप म्हणजे ‘बकासुराचा’ पक्ष!:न्याय हवा असेल तर ‘बागेश्वर बाबां’कडे जायचे का?

मुंबई-भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना...