पुणे लघुपट महोत्सवात ‘कावळा उड’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

Date:


पुणे – दहाव्या पुणे लघुपट महोत्सवात आशुतोष जरे दिग्दर्शित ‘कावळा उड’ लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर ‘सायलेंट टाईज’ लघुपटासाठी सई देवधर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.
मराठी चित्रपट परिवारतर्पेâ आयेजित महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे आणि ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड यांच्या हस्ते झाले.
‘मिश्टी दोई’ लघुपटासाठी शिबु साबळे यांना दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले तर ‘सायलेंट टाईज’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले. ‘अ सायलेंट व्हर्बल’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट संकलन सह सर्वोत्कृष्ट स्टुडंट लघुपटाचे पारितोषिक पटकाविले. सर्वोत्कृष्ट जाहीरातीचे पारितोषिक ‘युएसएलपी शॉवर’ लघुपटाला मिळाले तर ‘ह्ू इज द विमेन्स डे फॉर’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारिातोषिक पटकाविले. केरळमधील ‘मारवैरी’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट सांगितिक लघुपटाचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारिताषिक शरद जाधव यांनी ‘एक एमआर कि मौत’ या लघुपटातील अभिनयासाठी पटकाविले तर वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ‘कावळा उड’ साठी पारितोषिक मिळाले. ‘कुंभिल शिवा’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि पटकथचे पारितोषिक मिळाविले. ‘गर्ल’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट संंकल्पनेचे पारितोषिक मिळाविले तर दुर्गा आजगांवकर यांच्या ‘दि ईटरनल फ्लो’ लघुपटाने बेस्ट नॅरेटिव्ह लघुपटाचे पारितोषिक मिळाविले. ज्येष्ठ निर्मात्या मार्था बेकर, सारथी निरंजन आणि मायकेल सिव्हेला यांनी परिक्षण केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...