पुणे – आपला वेळ देणे, आर्थिक मदत करणे या गोष्टीतर सर्वचजण करत असतात परंतु वैयक्तीक लक्ष घालून कामगारांना प्रत्येक पाऊलावर मार्गदर्शन करून त्यांना अधिकाधिक परिपूर्ण बनवण्याचे काम कुशलचे सदस्य करीत आहेत. यामुळेच कमी कालावधीत त्यांचे नाव जागतिक स्तरावर नावाजले जात आहे, अशी भावना प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केली.
जागतिक कौशल्य स्पर्धेच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन फिनोलेक्सचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते . यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई नैशनलचे सूरजीत रॉय,अनुज भंडारी उपस्थित होते.
यावेळी कटारिया म्हणाले कि, कुशल हा क्रेडाई पुणे-मेट्रोचाच लाडका सुपुत्र आहे पण म्हणतात ना ‘बेटा बाप से सवाई’असल्यामुळे हा आमचा सुपुत्र आमचे नाव उज्ज्वल करत आला आहे आणि यापुढे त्यांचे(क्रेडाई कुशल) असेच यशस्वी मार्गक्रमण करत राहो.
कुशल क्रेडाई या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी आठ कामगारांना प्रशिक्षित करीत आहे. ही स्पर्धा २०१७ मध्ये अबुधाबी येथे घेण्यात येणार आहे.अशी माहिती कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ यांनी दिली. ते पुढे म्हणाले कि, भविष्यात हे कुशल कामगार एकुणच बांधकाम व्यवसायासाठी अधिक दर्जात्मक आणि नियोजनबध्द काम करतील. जेणेकरून आपल्या देशाचा विकास अधिक जलदगतीने होऊ शकेल. मागच्या वर्षी ब्राझील येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये कुशल क्रेडाईच्या कामगाराने मेडलीयन फोर एक्सेलंस पटकाविले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवीश थकवानी यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर बेलवलकर यांनी केले