कोरोनामुळे आता CBSE 10 वीच्या परीक्षा रद्द, थेट पुढच्या वर्गात जाणार विद्यार्थी; 12 वीच्या परीक्षा देखील स्थगित, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Date:

नवी दिल्ली-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने CBSE अर्थात केंद्रीय बोर्डाच्या 10 वी वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 10 वीचे विद्यार्थी परीक्षा न देताच थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. तर CBSE 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात 1 जून रोजी पुनरविचार करून निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षा घेणार असल्यास त्याच्या 15 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.

जे विद्यार्थी समाधानी नसतील त्यांना परीक्षा देता येईल

  1. CBSE बारावीच्या परीक्षा 4 मे ते 14 जून पर्यंत होणार होत्या. त्या टाळण्यात आल्या. यावर 1 जून रोजी पुनरविचार करून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असल्यास 15 दिवसांपूर्वी कळवले जाईल.
  2. CBSE दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षा सुद्धा 4 मे पासून सुरू होणे अपेक्षित होते.
  3. आता CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच थेच अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.
  4. जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. या परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घेतल्या जातील.

मोदींच्या बैठकीत झाला निर्णय

पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या बैठकीत बुधवारी दुपारी हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी अनेक राज्य सरकारांनी CBSE च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामध्ये पंजाब आणि दिल्ली सरकारचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी केली होती परीक्षा रद्द करण्याची मागणी

CBSE च्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा 4 मे रोजी घेतल्या जाणार होत्या. परंतु, ऑल इंडिया स्टूडेंट एसोसिएशनच्या वतीने या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरण्यात आली. संघटनेचकडून शिक्षण विभागाला पत्र देखील पाठवण्यात आले होते. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी #CancelBoardExam2021 हॅशटॅगसह कॅम्पेन सुद्धा चालवले. CBSE बोर्डाच्या एकूण 30 लाख विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा दिली जाणार होती.

महाराष्ट्रात आधीच रद्द झाल्या परीक्षा

कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा परीक्षा रद्द करून थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. कोरोनाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अशात राज्य सरकारांकडून स्टेट बोर्डाच्या आणि इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. काही राज्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...