कोरोना इफेक्ट :होली मिलन समारंभात सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

Date:

नवी दिल्ली – देशभर कोरोनाव्हायरसचे आतापर्यंत 28 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली. त्यातच कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या होली मिलन समारंभात सहभागी होणार नाही अशी घोषणा केली आहे. तज्ञ मंडळींनी आपल्याला एका ठिकाणी जमा होण्यास मनाइ केली आहे. त्यामुळे, मी या कार्यक्रमात सहभागी नाही होण्याचा निर्णय घेतला असे मोदींनी ट्विट केले आहे.

भारतात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन 28 रुग्णांची औपचारिक माहिती दिली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या तपासासाठी तेथेच एक लॅब तयार केली जाणार आहे. सोबतच, भारतात परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची स्क्रीनिंग केली जाणार आहे. यापूर्वी केवळ 12 देशांतून येणाऱ्यांच्या चाचण्या घेतल्या जात होत्या अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. त्यातच बुधवारी इटलीचे 14 पर्यटक संशयित रुग्ण असल्याचे समोर आले. या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये ठेवले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत 3000 चाचण्या झाल्या आहेत. 15 पेक्षा अधिक लोकांचे लॅबमध्ये परीक्षण केले जात आहे. कोरोनाव्हायरसचे संक्रमण तोंडातील पाण्याने वाढू शकते. याची खास काळजी घ्यायला हवी. लोकांनी मास्क लावून बाहेर पडावे आणि हात व्यवस्थित धूत राहावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्य तो टाळावे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) देशाची सर्वात जुनी प्रयोगशाळा आहे. आरोग्य विभाग या प्रयोगशाळेच्या संपर्कात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ मुंबई, दि. ११...

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ

MPSC च्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही, ऑफलाईन...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीत

तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतपुणे: डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा...

वडकी नाला व कदमवाकवस्ती येथे दिंडीप्रमुखांचा सत्कार; वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण...