पुणे जिल्हयातील विकासासाठी सुमारे 30 कोटींचे सामंजस्य करार- पालकमंत्री गिरीश बापट

Date:

मुंबई: पुणे जिल्हयातील आरोग्य, वाहतूक, शिक्षण, यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी देशातील नामवंत प्रसिध्द कंपन्या व सेवाभावी  संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे या संदर्भातील सामंजस्य करार मुंबई येथे करण्यात आला आहे. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुणे जिल्हयातील वाढती लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक, पर्यावरण याबाबतचे प्रश्न सोडविण्या साठी शासकीय यंत्रणेला सहयोग व्हावा यासाठी डॉ. आनंद बंग यांच्या पुढाकाराने या क्षेत्रात काम करणाऱ्यासंस्था व कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये लिपिन फाऊंडेशन ग्रामीण भागाच्या विकासासाठी, बॉश  कंपनी वाहतुक शिक्षणासाठी पार्क ची निर्मीती करणे,टाटा ट्रस्ट पोषण आहाराबाबत, रूबल नागी फाऊंडेशन मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, पिरामल ही कंपनी आरोग्यासेवा पुरविणे मर्सडीज बेंझ या कंपनी सोबत जिल्हा परिषदेतील मुलांना टॉयलेट उभारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. नॅचरल कॉन्झरवेशन ही वॉटर प्रोजेक्टसाठी काम करणे तर डॉ. सुयोग सोमकुवार, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत सोनोग्राफी सेंटर सुरू करणे, सलाम बॉम्बे ही संस्थेसोबत 10 हजार मुलांना कला कौशल्ये शिकविणे संदर्भात सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
या करारात जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालीका तसेच जिल्हा परिषद पुणे यांचा समावेश आहे. या वेळी पुण्याचे पालकमंत्री व अन्न नागरी मंत्री गिरीश बापट, डॉ. आनंद बंग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालीका यांचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकरी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांच्या अपेक्षांना जबाबदारीने सामोरे जाऊ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, प्रतिनिधी –पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार...

औंध, बोपोडीत भाजपने उडवला विरोधकांचा धुव्वा, चारही उमेदवार विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी मतदार संघात...

गुलालात नहाले पुण्याचे कारभारी …. पहा विजयी उमेदवारांची यादी

पुणे- येथील महा पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 83 जागांची आवश्यकता...