Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे मोदी सरकारचे आश्वासन फोल तेहसीन पुनावाला यांचा आरोप

Date:

पुणे :   नोटाबंदीच्या नावाखाली लोकांना बचतीचा उपदेश देणारे भाजपाचे नेते अर्थमंत्री अरुण जेटलींच्या मुलीच्या लग्नात झालेली पैशाची उधळपट्टी विसरतात. नोटाबंदी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मोदींना उत्तर देता आले नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. तेही त्यांना पूर्ण करता आले नाही, असा आरोप युवा नेते तेहसीन पूनावाला यांनी केला.
पुणे शहर कॉंग्रेस कमिटी व दि मुस्लिम फाउंडेशन तर्फे नोकरी आपल्या दारी या भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दि मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. हाजी गफूर पठाण, अल्पसंख्याक समितीचे नदीम मुजावर, नगरसेवक रईस सुंडके, हाझी फिरोज शेख, अनिस सुुंडके, निलोफर मुल्ला, परवीन हाझी फिरोज आदी यावेळी  उपस्थित होते.
तेहसीन पुनावाला म्हणाले, केंद्रातील भा.ज.पा. सरकार देशाच्या प्रगतीच्या गप्पा मारत असताना आज कोंढव्यातील नागरिकांसोबत येथील बँका दुजाभाव करीत आहेत. मागील अडीच वर्षांपासून जनता दहशतीखाली जगत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, काँग्रेसने तयार केलेले उद्योग भाजप सरकारने बुडविले. पुणे शहराच्या विकासासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या मागे उभे रहावे. रमेश बागवे म्हणाले, मुस्लिम तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून त्यामुळे नोकरी महोत्सवाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे. दि मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कोंढवा आणि मिठानगर भागातील युवक, युवती आणि गृहिणींसाठी या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी-ज्येष्ठ नेते शरद...

भाजपच्या ओमकार कदम आणि सहकाऱ्यांवर अखेर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे -महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास...

एक्सप्रेसवेवर पोलिसांच्या ताफ्याचा मोठा अपघात:सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ मंगळवारी सकाळी एक मोठा...