इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाओ ‘ चा नारा देत बड्या धेंडांच्या विरोधात कारवाई केल्याची आठवण

Date:

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेस भवन येथे इंदिराजींच्या पुतळ्यास ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून जन्मशताब्दी महोत्सव वर्षाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रमेश बागवे होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष  रमेश बागवे म्हणाले, “आदिवासी भाग असो, शहरी भाग असो वा ग्रामीण भाग असो लोक इंदिराजींना
अम्मा-माता म्हणून ओळखायचे. इंदिराजींनी ‘गरिबी हटाओ ‘ चा नारा देत सावकारांच्या विरोधात कायदा करून तो अमलात आणला. इंदिराजींच्या २० कलमी कार्यक्रमामुळे आणि बँकेच्या राष्ट्रीयीकरणामुळे देशात कष्टकरी गरीब जनतेला न्याय मिळाला आणि आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध झाला. देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी इंदिराजींनी आपले बलिदान दिले. स्व. इंदिरा गांधी हे असे व्यक्तिमत्त्व होते की जगातील सर्व नेते त्यांचा आदर करायचे. प्रियदर्शिनी ते आयर्न लेडी असा त्यांचा जीवनाचा प्रवास. आज आपण त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सव वर्षाची सुरुवात करत आहोत. वर्षभर इंदिराजींच्या केलेले काम नव्या पिढीपर्यंत पोचविणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल.
यानंतर ज्येष्ठ पत्रकार  सदा डुंबरे यांचा सत्कार शहराध्यक्षबागवे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना
सदा डुंबरे म्हणाले, “इंदिराजींना देशातील जनतेचे प्रश्न माहीत होते. इंदिराजी देश चालवीत असताना समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करायच्या. इंदिराजी या देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे प्रतीक होत्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्मिती केली. ८० च्या दशकात पंजाब मध्ये शीख अतिरेकी स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत होते आणि पंजाब मध्ये अतिरेकी कारवाई दिवसेंदिवस वाढत चालली होती. अमृतसर च्या सुवर्ण मंदिरात हे अतिरेकी हत्यारांसह लपले होते.
देशाला या अतिरेक्यांच्या कारवाईमुळे नुकसान होणार आहे हे लक्षात घेऊन इंदिराजींनी भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिरात जाण्याचे आदेश दिला व अतिरेक्यांना नष्ट करण्यात भारतीय सैन्य यशस्वी ठरले . त्यांच्याकडून आजच्या पिढीला शिकण्यासारखं अनेक गोष्टी आहेत . समाजातील कष्टकरी जनता, कामगार, शेतकरी यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी केलेली भरीव कामगिरी जनतेपर्यंत पोहचविणे ही त्यांना त्यांच्या जन्मशताब्दीदिनी आदरांजली ठरेल .”
यावेळी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, अ.भा.महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.कमल व्यवहारे,  अभय छाजेड,अजित आपटे ,संगीत देवकर, युवक अध्यक्ष विकास लांडगे, अनिल सोंडकर, सदानंद शेट्टी,नगरसेवक मनीष आनंद, डॉ .सतिश देसाई, नुरुद्दीन सोमजी, मुख्तार शेख, रजनी त्रिभुवन, रमेश अय्यर, राजेंद्र पडवळ, रवी म्हसकर, अंजली निम्हण, नगरसेविका पूजा आनंद, मिलिंद काची, अनिस सुडके, लक्ष्मी घोडके, लता राजगुरू, सुरेश धर्मावत, जावेद निलगार, शानी नौशाद, नदीम मुजावर, राजेंद्र भुतडा, राज अंबिके, सोमेश्वर बालगुडे, जयकुमार ठोंबरे, सुनील घाडगे, मीरा शिंदे, सुलभा भोंडवे, सुजित यादव, वाल्मिकी जगताप, सुनील दैठणकर, राजेश पौडवाल, व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीसनिलेश बोराटे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम...

बड्यांची बडी हॉटेल्स ,पब रात्री दीड वाजेपर्यंत अन..खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, ठेले रात्री १० च्या आत बंद

पुणे- शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स,...