मुंबई-कोरोना महामारीविरुद्धच्या युद्धात भारताने एक मोठी कामगिरी पार केले असून आज एक नवा इतिहास रचला आहे. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोनाला प्रतिबंध करणारी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्याचा निश्चय केला आणि आज तो पूर्ण झाला असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
भारत देशाने लसीकरणाचा आज १०० कोटीचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला जात आहेत. पंतप्रधान मोदींजी यांचे अभिनंदन व आभार प्रकट करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील वसंत स्मृती, मुंबई भाजप कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमा अंतर्गत लसीकरणासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली, तसेच कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अविरत रूग्णसेवा करणाऱ्या कोरोना योध्यांच आभार व्यक्त करण्यात आले असल्याचे मंगल यांनी सांगितले.
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढ़ा, मुंबई भाजपा प्रभारी व आमदार श्री अतुल भातखळकर, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री शिव प्रकाश, भाजपा नेते व आमदार अँड आशिष शेलार यांच्या सहित मुंबई ज़िल्हा, मंडल तथा वॉर्ड मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.