गोळवलकर शाळेत ‘जोडी तुझी माझी’ संगीत स्पर्धा
पुणे -मुलांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांच्या हाती मोबाइल दिला जातो. मोबाइलमुळे कुटुंबातील संवाद संपत चालला आहे. तो पुनःस्थापित करण्यासाठी संगीतासारखे छंद जोपासले पाहिजेत, असे मत शास्त्रीय संगीत गायीका मंजिरी आलेगावकर यांनी व्यक्त केले.
डीईएस मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘जोडी तुझी माझी’ या संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून आलेगावकर बोलत होत्या. शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डॉ. सविता केळकर, मुख्याध्यापिका मंजूषा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहन पारसनीस आणि चित्रा पंडीत यांनी परिक्षण केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
गट क्र. 1 (प्राथमिक)
प्रथम क्रमांक – राधा खासनीस (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि मानसी खासनीस
दुसरा क्रमांक – अवधूत लेले (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि नीता लेले
गट क्र. 2 (प्राथमिक)
प्रथम क्रमांक – रघुनाथ निमकर (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि सुरश्री निमकर
दुसरा क्रमांक – आनंदी जायदे (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि सोमनाथ जायदे
गट क्र. 3 (5 वी ते 7 वी)
प्रथम क्रमांक – साईश्वरी गुंजाळ (एच. ए. स्कूल) आणि दत्तात्रय गुंजाळ
दुसरा क्रमांक – वेदांग असनिकर (डी. ई. एस. स्कूल) आणि ज्योती असनिकर
गट क्र. 4 (8 वी ते 10 वी)
प्रथम क्रमांक – अर्णव पुजारी (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि अपर्णा पुजारी
दुसरा क्रमांक – श्रेया वैद्य (एन. ई. एम. एस.) आणि केतकी वैद्य
पर्यवेक्षक विकास दिग्रजकर यांनी सूत्रसंचालन आणि राजश्री औटी यांनी आभार प्रदर्शन केले.