चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी

Date:

वाहतूककोंडी वर तातडीने विविध उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना

पुणे-चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला असतानाच तेथे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.पुण्यात कोथरूड मार्गे प्रवेश करणारे वाहन चालक जसे त्रस्त झाले आहेत तसेच महामार्गांवरून सातारा व सोलापूर कडे जाणारे वाहनचालक ही कोंडी, अपघात व खराब रस्त्यामुळे गाड्या नादुरुस्त होणे ह्याला त्रासले आहेत.या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,वाहतूक पो नि बापू शिंदे, मनपाचे प्रकल्प चे श्री. रणदिवे, भुसंपादन चे श्री. राजेंद्र थोरात,क्षेत्रीय अधिकारी सचिन तामखेडे,पथ विभागाचे श्री. शिर्के,स्वप्नील खोत एन सी सी चे धंनजय वडेर ह्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदारांचे प्रतिनिधी, भाजप चे कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,पदाधिकारी गणेश वर्पे, दुष्यन्त मोहोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह्या वेळी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व अडचणी समजून घेतल्या व सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना सुचविल्या व येत्या 8 दिवसात युद्धपातळीवर कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत अधिकाऱ्यांना बजावले.

प्रमुख उपाययोजना…
1) सर्व खड्डे तातडीने बुजविणे व विशेष सॉल्युशन चा वापर करून सदर काम करणे.
2) चांदणी चौकातून पुण्यात ( कोथरूड मार्गे ) प्रवेश करतानाच्या मार्गांवरील पत्रे तसेच मुळशी वरून चांदणी चौकात येताना रस्त्यावर असलेले पत्रे थोडे मागे सरकावून अतिरिक्त लेन तयार करणे, जेणेकरून वाहतूक सुकर होईल.
3) सर्व्हिस रस्ते डागडुजी करून त्वरित सुरु करणे.
4) 25 ट्रॅफिक वार्डन ची त्वरित नियुक्ती करणे.
5) दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास कायमस्वरूपी टोईंग व्हॅन ची व्यवस्था करणे.
6) रस्त्यावरील पसरलेली खडी उचलणे.
7) पुणे मनपा सोबत समन्वय साधून जागा ताबा हा विषय त्वरित मार्गी लावणे व त्यायोगे सर्व्हिस रस्ते व अन्य मार्ग प्रशस्त करणे.
यासह विविध छोटे मोठे विषय त्वरित पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पुढील आठवड्यात या विषयीचा पाठपुरावा करण्यात येईल असेही आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...