मुंबई, : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्थापन करण्यात आलेल्या श्री. गणेशाचे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात तयार करण्यात आलेल्या कृत्रीम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. श्री गणेश विसर्जनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून दिला.
श्री.गणेश विसर्जनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापौर स्नेहल आंबेकर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचे कुंटूबिय उपस्थित होते.या सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप दिला .