ऑक्टोबरफेस्ट- पुण्यातील पहिल्या आणि एकमेव स्पोर्ट्रेनमेंट डेस्टीनेशनमध्ये
पुणे- वाकड येथे नुकत्याच पुण्यातील पहिले आणि एकमेव असे स्पोर्ट्रेनमेंट क्लबचा, क्लब-२९ चा शुभारंभ झाला. क्रीडा आणि मनोरंजनाचा एकत्र आणि अविस्मरणीय अनुभव, तोही ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा सुविधांमध्ये दिल्या आहेत, जसे की, बॅडमिंटन, स्विमींग, स्क्वाश, शूटींग, अद्ययावत जिम, टेबल टेनिस इत्यादी. अशा एकून ३९ अॅक्टीव्हिटीज येथे असून क्लब-२९ मध्ये सलून आणि स्पा, तसेच बोलिईंग अॅली, विविध डायनिंगचे पर्याय, बॅक्वेट्स आणि २० लक्झरी रुम्स अशा सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.
सध्या क्लब-२९ मध्ये ऑक्टोबरफेस्ट सुरु असून त्यामध्ये विविध प्रकारच्या बियर्स आणि जर्मन क्युझिन्सची रेलचेल आहे.
क्लब-२९ मध्ये डायनिंगचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. स्टायलिश हिप स्पोर्टस बार कम बोलिंग अॅली स्किटल्स, जेथे तुम्ही एन्जॉय करु शकता जगभरातील उत्तम कॉकटेल्स, मॉकटेल्स फाईन स्पिरीट्स आणि बियर्स. मेन्युमध्ये तुम्हाला जगाच्या कानाकोपर्यातील उत्तम डिशेस आणि पारंपरिक नेहमीच्या डिशेसही दिसतील. क्लब-२९ च्या पहिल्या मजल्यावरील ऑल-डे डायनिंग, ऑल डे कॉफी शॉपचा पर्याय हा तुम्हाला मल्टी-क्युझिनचा आनंद देईल. तसेच आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण रेस्टॉरंट-फलक हे रुफटॉप रेस्टॉरंट असेल, जे आम्ही लवकरच सुरू करत आहोत.
श्री. जयंत कनेरिया, श्री. मोहन कलाटे, श्री. धिरजलाल हन्सालिया, श्री. संजय कलाटे, श्री. मयूर कलाटे आणि श्री. नीरज कनेरिया यांच्या संयुक्त संकल्पनेतून साकार झालेला क्लब-२९ हा एक प्रायव्हेट क्लब असून इथे तुम्हाला स्पोर्टस, आरोग्य आणि करमणुकीची अनेक साधने उपलब्ध असतील. प्राधान्याने या क्लबचा उद्देश क्रीडा आणि आरोग्याविषयीच्या सेवा देणे हा आहे. तसेच क्लबच्या माध्यमातून पुण्यात अत्यधुनिक क्रीडा सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
क्लब-२९ च्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे असून भारताची मान गौरवाने उंचावणारे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या क्लबशी संलग्न आहेत. तसेच हे खेळाडू आता नव्या पिढीला प्रशिक्षण देण्यासही सज्ज आहेत. त्यामध्ये अंजली भागवत, निखिल कानेटकर अशासारख्या नामांकित खेळाडूंचा समावेश आहे.
क्लब-२९ मध्ये देण्यात येत असलेल्या सुविधा अशा आहेत-
– स्विमिंग
– बॅडमिंटन
– स्क्वाश
– टेबल टेनिस
– बिलियर्डस
– डार्टस
– शूटींग रेंज
– क्रिकेट
– बोर्ड गेम्स : चेस, कॅरम, स्क्रॅबल इत्यादी
– बोलिंग अॅली : ४ लेन्सची बोलिंग अॅली
– पूल : स्नूकर/पूल टेबल्स
– जिम्नॅशियम
– युनिसेक्स स्पा आणि सलून
– कार्ड रुम
– गेमिंग झोन
एका कुटुंबाला, त्यांच्या मुलांची काळजी न करता आपला वेळ आनंदाने घालवायचा असेल तर क्लब-२९ ला पर्याय नाही. तसेच मेंबरशिपचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेतच.