मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विराजमान झालेल्या विघ्नविनाशक श्री गणाधिशाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री गणेशाची मुर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले..शाह यांचे आगमन होताच मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदे यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. विघ्नहर्त्या गजाननाची सुबक मूर्ती, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

मुंबई विमानतळावर आगमन होताच स्वागत … रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झालेत. त्यांनी आज लालबाग गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी महालक्ष्मी देवीवरील एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अमित शहांचा हा पहिला दौरा आहे. मुंबई पालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आता भाजप चे लक्ष्य मुंबई महापालिका आहे.

सह्याद्री बंगल्यावर दिग्दर्शक रोहित शेट्टी शाह येण्यापुर्वीच पोहोचले आणि आल्यानंतर येथे त्यांची भेट झाली या भेतीमागील कारण मात्र समजू शकले नाही .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह्याद्री बंगल्यावर अमित शाह यांचे स्वागत झाले.