पुणे-येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखुयुक्त पदार्थांचे सेवन न करण्याचा तसेच आपल्या संपर्कातील व्यक्तीनाही तंबाखूमुक्त जीवन जगण्यास प्रोत्साहन देण्याचा सामुहिक महासंकल्प संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांच्या उपस्थितीत केला.
कर्वे समाज सेवा संस्था व महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयामध्ये संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, रजिस्ट्रार विनायक कस्तुरे व प्रा चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूमुक्त जीवन संकल्प उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः संचालक डॉ वलोकर यांच्याकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची सामुहिक शपथ घेतली.
डॉ वलोकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना समाजात आपल्या संपर्कात असणार्या नागरिकांना तंबाखूमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. प्रा चेतन दिवाण यांनी विध्यार्थ्यांच्या संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या.मकबूल देशिंग व प्रवीण गुंजाळ यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते