पुणे-
बाबूजगजीवनराम यांच्या नावाने चर्मकार आयोग स्थापन व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली ” भव्य मोर्चा ” काढण्यात आला . मोर्चाची सुरुवात गणेश पेठयेथील संत देवजीबाबा हराळे वैष्णव संस्थायेथून झाली पुढे दारूवाला पूल , पंधरा ऑगस्ट चौक , साधू वासवानी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला .
चर्मकार समाज देशातील २० टक्के लोकसंख्येत असून सुध्दा आर्थिक , सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासलेला आहे व शासनाच्या योजना व सवलतीपासून वंचित आहे यासाठी चर्मकार समाजासाठी भारताचे माजी उपप्रतप्रधान स्व. बाबूजगजीवनराम यांच्या नावाने आयोग स्थापन व्हावा मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली , यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे कांबळे , राज्य कार्याध्यक्ष सूर्यकांत गवळी ,मोर्चाचे संयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ पोटे ,जगदीश पोटे , राज्य सचिव सुदाम लोखंडे , राज्य उपाध्यक्ष ऍड. आनंद गवळी , जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे , सुखदेव आबनावें , महिला जिल्हाध्यक्ष मनीषा तिखे , जिल्हा उपाध्यक्ष लहू वाघमारे , राजू पवार , श्रीरंग आबनावें , वसंत कोरेगावकर , लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत पाचारणे , श्रीकुमार काळे , सुखदेव सूर्यवंशी , कैलास डोईफोडे , राजेंद्र सोनवणे , अनिल सातपुते , राजाभाऊ तिखे , सतीश वाघमारे , संजय लोकापुरे , तुळशीराम साळुंखे, दशरथ कांबळे , बाबा हंकारे , संचल कदम , विकास सोनवणे , प्रकाश ननावरे , कैलास आबनावें , जयदेव इसवे , सुरेश पोटे , उत्तरेश्वर कांबळे , वसंत कांबळे , पंढरीनाथ आबनावें , बजरंग राजगुरू , प्रशांत कदम , राकेश तोरे , राजाभाऊ लांडगे , मोठ्या प्रमाणावर चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
आयोगाबद्दल माहिती व मार्गदर्शन ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले . आभार चर्मकार संघ पुणे शहर कार्याध्यक्ष रविंद्र खैरे यांनी मानले. यावेळी देशात चर्मकार समाजाला रविदासीया समाज म्हणून मान्यता मिळावी , प्रत्येक राज्यात संत रोहिदास ( रविदास ) चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी , स्व. बाबूजगजीवनराम , मा. उपप्रतप्रधान यांना भारतरत्न देयूनं सन्मानित करावे , संत रोहिदास ( रविदास ) जयंती दिन शासकीय सुट्टी करावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले .