श्रीरामजी संस्थान तुळशीबाग, पुणे ; कीर्तनकार विकासबुवा डिग्रसकर यांचे दत्तजन्माचे कीर्तन
पुणे : जो जो जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा..पालख बांधविला सायासीं निर्गुण ऋषिचे वंशीं…पुत्र जन्मला अविनाशी । अनसूयेचे कुशीं… दत्तजन्माचा पाळणा म्हणत दत्तनामाच्या जयघोषात पारंपरिक वातावरणात तुळशीबाग राम मंदिरात दत्तजन्म सोहळा पार पडला. दत्तजन्म सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी यावेळी गर्दी केली.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात दत्तजयन्ती निमित्त दत्तजन्म सोहळा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. कीर्तनकार विकासबुवा डिग्रसकर यांचे दत्तजन्माचे कीर्तन यांचे दत्तजन्माचे कीर्तन झाले. मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.
विकासबुवा डिग्रसकर म्हणाले, अहंभाव आपल्या ठायी असेल तर ज्ञान आणि भगवंताची प्राप्ती होणार नाही. भगवान दत्तात्रय आशीर्वाद देण्यासाठी आजही आहेत. परंतु सोहोहम सोडून देवोहमकडे वाटचाल केली तर त्यांचे अस्तित्व जाणवेल. संतांनी भगवंताकडे त्याचा विसर न होण्याचे मागणे मागितले. आपणही देवाकडे तेच मागणे मागू असेही त्यांनी सांगितले.