पुणे, ता. १० – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत वन्यजीव प्राणी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकांसाठी या विषयावरील चित्रकला आणि जंगल किंवा प्राण्यांची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. गायिका बिल्वा द्रविड यांनी प्राणी आणि जंगलावर गाणी सादर केली. यशोधन जटार यांनी तबल्यावर साथ दिली. शिक्षिका लीना सुमंत यांनी सूत्रसंचालन केले. आरगनायझेशन ऑफ वाइल्ड लाईफ स्टडिज या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्राण्यांची माहिती दिली. तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळा असा संदेश दिला. मधुरा पटवर्धन आणि सहकार्यानी जंगल या विषयावर शाळेत सजावट केली. शाळेला भेट देणार्यांना प्राण्यांच्या चित्रांचे मास्क वाटण्यात आले. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून या